खरीप पिकांसाठी खत व्यवस्थापन तंत्र महत्त्वाचे : डॉ. अशोक ढगे

प्रवरासंगम येथे खरीप हंगाम चर्चासत्र
प्रवरासंगम – खरीप पिकांसाठी सेंद्रिय, रासायनिक व जीवाणू खतांबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर करणे आवश्‍यक असून, खत व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन डॉ. अशोक ढगे यांनी केले.
उन्नत शेती व समृध्द शेतकरी अभियान पंधरवडानिमित्त प्रवरासंगम (ता. नेवासे) येथे कृषी खात्यामार्फत खरीप हंगाम चर्चासत्र उत्साहात पार पडले. या प्रसंगी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोकराव ढगे यांनी खत व्यवस्थापनाचे महत्त्व विशद केले.
मंडल कृषी अधिकारी भारत गुंजाळ यांनी विविध पिकांच्या जाती, बियाणे प्रक्रिया व पीक संरक्षण यासंबंधी मार्गदर्शन करून कृषी खात्याच्या योजनांची माहिती दिली. अध्यक्षस्थानी उपाध्यक्ष प्रकाश पांडव होते. शेतकऱ्यांनी पैशांचा विचार करून लाभदायक पीक निवडावे, असा सल्ला डॉ. ढगे यांनी दिला.
या वेळी सरपंच सुनील बाकलीवाल, “मुळा’चे संचालक बाळासाहेब पाटील, उपसरपंच राजेंद्र सावंत, कृषी पर्यवेक्षक निवृत्ती भागवत, वि. का. सोसायटीचे अध्यक्ष संदीप सुडके, दादासाहेब झावरे, प्रा. मोहिनीराज कदम, नीलेश रेळकर, केशवराव वाघमारे, विजय मारकळी, भाऊसाहेब मते, सुनील कुमावत व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार कृषी विभाग खात्याचे अधिकारी लक्ष्मण सुडके यांनी केले.

मंडल कृषी अधिकाऱ्याचा सत्कार..
मंडल कृषी अधिकारी भारत गुंजाळ सेवानिवृत्त होत आहेत. त्यांनी परिसरात कर्तव्यदक्षपणे कामकाज केल्याबद्दल याप्रसंगी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून निरोप समारंभ पार पडला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)