खरा लेखक समाजातील दूःख दूर करणारा असतो – लक्ष्मीकांत देशमुख

नांदेड : “साहित्याचा उद्देश मानवी संस्कृतीची जोपासना करणे हा असतो. खरा लेखक हा मानवतेचा जयजयकार करत असतो. समाजातील दू:ख दूर करणे हेच त्याचे कार्य असते” असे प्रतिपादन बडोदा येथे होणाऱ्या ९१व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नवनिर्वाचित अध्यक्ष प्रख्यात लेखक आणि माजी सनदी अधिकारी लक्ष्मीकांत देशमुख  यांनी केले.

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर यांच्या हस्ते संमेलनाध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते, ‘मी प्रेमचंद यांच्या परंपरेचा पाईक मानणारा लेखक आहे. प्रगतीशील विचारधारा ही मला नेहमीच महत्त्वाची वाटत आली. जगातील प्रश्न दूर होण्यासाठी मी लेखन केले आहे’ असेही देशमुख यावेळी म्हणाले.

-Ads-

मराठी ही अभिजात होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले. अध्यक्षोत्तर कार्यकाळात राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची त्यांनी माहिती दिली. मराठीतील उत्तम कलाकृतींचे इंग्रजी व अन्य भाषेत भाषांतर होणे आवश्यक असल्याचेही लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले.

कुलगुरू डॉ.पंडित विद्यासागर मराठी ज्ञान भाषा होण्यासाठी सामुहिक प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. लक्ष्मीकांत देशमुख सत्कार सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर कुलसचिव डॉ. रमजान मुलाणी, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. रवी सरोदे, भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलाचे संचालक प्रा. डॉ. दिलीप चव्हाण आणि मराठी विभागप्रमुख डॉ. केशव सखाराम देशमुख हे उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)