खराळवाडीची रक्षणकर्ती

पिंपरी – शहरात नवरात्रोत्सवाला सुरूवात झाली असून शहरातील ग्रामदैवतांच्या दर्शनासाठी गर्दी होताना दिसत आहे. पिंपरी येथील खराळवाडीमध्ये खराळआईची घटस्थापना झाली आहे. खराळवाडीची रक्षणकर्ती असे या देवीला संबोधले जाते.

श्री खराळआई दैवत खराळवाडीचे ग्रामदैवत असून खराळवाडीचे नाव खराळआईच्या नावावरूनच पडले असल्याची माहिती मंदिराचे व्यवस्थापक राजेंद्र कलापूरे यांनी दिली. याठिकाणी देवी प्रकट झाली अशी अख्यायिका आहे. गेली अनेक वर्षे मंदिरात घटस्थापना केली जाते. दरवर्षी हजारो भाविक दर्शनासाठी लांबून या ठिकाणी येतात. त्यांच्या मनातील इच्छा देवीला सांगतात आणि नवस कबूल करतात.

नवरात्रोत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 25 वर्षापूर्वी खराळआई सेवा समिती ट्रस्टची स्थापना करण्यात आली. या ट्रस्टच्या माध्यमातून विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये वृक्षरोपण, जेष्ठ नागरिकांसाठी आरोग्य शिबीर, सणाच्या दिवशी अन्नदान तसेच, मार्गशीष महिन्यात प्रत्येक मंगळवारी अन्नदान करण्यात येते. मे महिन्यात यात्रेच्या वेळी देखील घटस्थापना करून नऊ दिवस आरती करण्यात येते. तसेच विविध सामाजिक उपक्रमही राबवण्यात येत असल्याचे कलापूरे यांनी सांगितले. खराळआई सेवा समिती ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्‍वर कलापूरे, उपाध्यक्ष पोपट कलापूरे, खजिनदार शंकर शेडगे, सचिव गोविंदा वाघरूळकर हे प्रमुख पदाधिकारी आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)