…खराब हवामानातही चाचणी

मुंबई – खराब हवामान असतानाही कंपनीने उड्डाणासाठी आग्रह केला, असा आरोप पायलट मारिया यांचे पती प्रभात कथुरिया यांनी केला आहे. मारिया आणि प्रदीप राजपूत यांनी खराब हवामान असल्याचे सांगितले. मात्र कंपनीने आग्रह केला, असे प्रभात यांनी सांगितले. 28 डिसेंबर 1970 साली जन्मलेल्या आणि मूळच्या अलाहाबादच्या असलेल्या मारिया कुबेर यांचा विवाह प्रभात कथुरिया यांच्यासोबत झाला. त्यांना एक 15 वर्षांची मुलगी आहे.

पतीसह सध्या त्या मीरा रोड येथे राहतात. मारिया यांच्याकडे एक हजार तास विमान उड्डाणाचा अनुभव आहे. खराब हवामान असल्याचे सांगूनही कंपनीने चाचणी करण्याचा आग्रह धरला. यासाठी मारिया यांनी सकाळी 8 वाजताच घर सोडले. प्रभात यांनी दुपारी एक वाजताच “व्हेअर आर यु ?’ असा मेसेज केला होता. पण त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ प्रतिसाद न मिळाल्याने प्रभात यांच्या मनात शंका निर्माण झाली आणि भीती वाटू लागली. अखेर अपघाताची बातमी त्यांनी टीव्हीवरच पाहिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)