खराब सुरूवातीनंतर कोहली – रहाणेने डाव सावरला

साऊथहॅम्पटन: मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी विजय अत्यावश्‍यक असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडने भारतीय संघासमोर विजयासाठी 245 धावांचे आव्हान ठेवले आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला तीन धक्के बसले आहेत. भारताची सुरूवात खराब झाली. लोकेश राहुल भोपळाही न फोडता माघारी परतला. तर पहिल्या डावातील शतकवीर पुजाराही 5 धावांवर बाद झाला. तर पाठोपाठ सलामीवीर शिखर धवनही 17 धावांवर तंबूत परतला. त्यामुळे उपहारापर्यंत भारताची अवस्था 3 बाद 46 अशी झाली आहे.

सॅम करनने पुन्हा एकदा उपयुक्त खेळी साकारून इंग्लंडला समाधानकारक धावसंख्या उभारून दिली. इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या कसोटीत विजयासाठी भारतासमोर 245 धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांत गडगडला. कुरनने 46 धावांची उपयुक्त खेळी केली.

8 बाद 260 धावांवरून इंग्लंडने तिसऱ्या दिवसाच्या खेळाची सुरूवात केली. मोहम्मद शमीने दिवसातील पहिल्याच चेंडूवर स्टुअर्ट ब्रॉडला बाद केले. त्यानंतर करनने स्ट्राईक स्वतःकडे राखताना धावसंख्या वाढवण्याचे प्रयत्न केले. पण, अतिरिक्त धाव घेण्याचा नादात तो धावबाद झाला आणि इंग्लंडचा दुसरा डाव 271 धावांवर गडगडला. कुरनने 128 चेंडूंत 6 चौकारांसह 46 धावा केल्या. यावेळी भारताकडून मोहम्मद शमीने 4, इशांत शर्माने 2 तर बुमराह आणि अश्विनने 1-1 बळी टिपला आहे.

तत्पूर्वी, भारताचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. चेतेश्वर पुजाराने एकाकी झुंज देत नाबाद 132 धावांची खेळी केली. पण त्याला इतर फलंदाजांची अपेक्षित साथ मिळाली नाही. त्यामुळे भारताला डावाअखेरीस केवळ 27 धावांची आघाडी मिळवता आली. चेतेश्वर पुजारा आणि कर्णधार विराट कोहली या जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण दुसऱ्या सत्रात कोहली 46 धावांवर बाद झाला. इंग्लंडकडून मोईन अलीने 5, ब्रॉडने 3 तर स्टोक्‍स आणि कुर्रानने 1-1 बळी टिपला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)