खराब मतदान यंत्रे माघारी

जिल्हा प्रशासनाकडून 340 खराब यंत्रे औरंगाबादला रवाना

नगर – भारत निवडणूक आयोगाकडून नगर जिल्हा प्रशासनाला लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्राप्त झालेली मतदान यंत्रांपैकी 340 खराब यंत्रे पुन्हा माघारी पाठविण्यात आली आहे. बॅलेट, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट यंत्रांचा यात समावेश आहे. खराब यंत्रे औरंगाबाद येथे जमा होणार असून, नगरमधून हा ट्रक पोलीस बंदोबस्तात रवाना करण्यात आल्याची माहिती जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

केंद्र सरकारच्या संरक्षण मंत्रालयाच्या अख्यारीत असलेल्या भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड कंपनीकडून देशभरातील जिल्हा प्रशासनाला नवीन मतदान यंत्रे पुरविण्यात आली आहे. नगर जिल्हा प्रशासनाला 17 हजार 346 मतदान यंत्रे मिळाली होती. त्यात बॅलेट 8 हजार 20, कंट्रोल 4 हजार 663 आणि व्हीव्हीपॅट 4 हजार 663 यंत्रांचा समावेश होता. या मतदान यंत्राची तपासणी देखील भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेड कंपनीच्या अधिकाऱ्यांनीच करून दिली. सुमारे दोन महिने या मतदान यंत्रांची तपासणी सुरू होती. या तपासणीत बॅलेट युनिट 43, कंट्रोल युनिट 97 आणि व्हीव्हीपॅटची 200 यंत्रे खराब आढळून आली. अशी एकूण 340 यंत्रे खराब निघाली. लाइट बंद होणे, बटन प्रेस न होणे, चालत नसणे, चालू-बंद होणे आदी कारणांनी ही यंत्रे बंद होत होती.

जिल्हा प्रशासनाने ही खराब यंत्रे आज माघारी पाठवून दिली आहेत. राज्यभरातील जिल्हा प्रशासनाची सर्वच खराब यंत्रे औरंगाबादला जमा होणार आहे. त्यानंतर ती बेंगळूरू येथील भारत इलेक्‍ट्रॉनिक्‍स लिमिटेडकडे जमा होणार आहे. जिल्हा प्रशासनाने औरंगाबादकडे ही खराब यंत्रे पाठवून देतो त्याबरोबर अधिकाऱ्यांचा ताफा पाठविला आहे. उपजिल्हाधिकारी राजेंद्र वाघ यांच्यासह शस्त्रधारी चार पोलीस कर्मचारी व अधिकारी यांचा स्वतंत्र ताफा आहे. ही यंत्रे तिथे जमा करून हा ताफा लगेचच माघारी फिरणार आहे.

जिल्हा प्रशासनाला मिळालेल्या मतदान यंत्रांपैकी सुमारे 340 यंत्रे खराब निघाली आहे. ती जमा करून त्याबदल्यात तितकची चांगली यंत्रे मिळणार आहेत. मिळणाऱ्या नवीन यंत्रांची देखील तपासणी होणार आहे. त्यानंतरच ती वापरण्यात येईल.
– अरुण आनंदकर
उपजिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक शाखा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)