खराब कामगिरीनंतर देखील शास्त्री आणि खेळाडू मालामाल

मुंबई: भारताचा संघ सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाने टी-20 मालिका वगळता एकदिवसीय आणि कसोटी मालिकेत खराब कामगिरी केली. सध्या सुरु असलेल्या पाचव्या आणि अखेरच्या कसोटीत देखील भारताची स्थिती खराब आहे. खेळाडूंच्या या कामगिरीवर चाहते प्रचंड नाराज आहेत, असे असताना भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) मात्र खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांना मालामाल केले आहे.

बीसीसीआयने भारतीय क्रिकेटपटूंना 2018 सालात दिल्या गेलेल्या मानधनाचे तपशील जाहीर केले आहेत. 2018 वर्षाच्या सुरुवातीला भारतीय संघाचे दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता. या दौऱ्यापासून आतापर्यंत खेळलेल्या खेळाडूंचं मानधन बीसीसीआयने चुकतं केलं आहे. यामध्ये सर्वात आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे भुवनेश्वर कुमारने 3 कोटी 73 लाख 6 हजार 631 रुपये कमावत आपल्या संघातील दिग्गज खेळाडूंना मागे टाकलं आहे. याचसोबत बीसीसीआयने प्रशिक्षक रवी शास्त्री यांना 3 महिन्यांचं 2 कोटींपेक्षा जास्त मानधन दिलं आहे.

बीसीसीआयने रविवारी मुख्य प्रशिक्षक आणि अन्य खेळाडूंना देण्यात येणाऱ्या मानधना विषयीची माहिती प्रसिद्ध केली. यात खेळाडूंना सेंट्रल कॉन्ट्रॅक्‍टची रिटेन फी मिळाली आहे. तर कसोटी खेळणाऱ्या क्रिकेटपटूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषेदकडून कसोटी क्रमवारीतील बक्षीसाची रक्कम वाटण्यात आली आहे. इंग्लंडच्या दौऱ्यात रवी शास्त्री यांच्या कामाच्या पद्धतीवर टीका केली जात असली तरी बीसीसीआयने त्यांना आगाऊ मानधन देण्यात आले आहे. शास्त्री यांना 18 जुलै ते 17 ऑक्‍टोबर दरम्यानच्या प्रशिक्षणाचे मानधन आगाऊ दिले आहेत. ही रक्कम 2.5 कोटी इतकी आहे. शास्त्री 2016पासून भारतीय संघाचे प्रशिक्षक आहेत आणि त्यांचे कार्यकाळ पुढील वर्षी इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकापर्यंत आहे. क्रिकेट जगतात सर्वाधिक मानधन घेणाऱ्या शास्त्री यांना वर्षाला 8 कोटी दिले जातात.

बीसीसीआयने शास्त्री यांच्याबरोबरच संघातील खेळाडूंना देखील आगाऊ मानधन दिले आहे. कर्णधार विराट कोहलीला दक्षिण आफ्रिकेतील वनडे आणि कसोटी मालिका तसेच आयसीसीकडून देण्यात आलेले बक्षिस मिळून 1.25 कोटी, उपकर्णधार रोहित शर्मा याला आफ्रिका दौऱ्यापासून ते निदाहास चषकासाठी 1.12 कोटी, हार्दिक पांड्या याला ऑक्‍टोबर 2017 ते मार्च 2018 या कालावधीसाठी 1.11 कोटी, शिखर धवनला 1 कोटी 39 लाख इतकी रक्‍कम बीसीसीआयने खेळाडूंना दिली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)