खराब अक्षराबद्दल अलाहाबाद उच्च न्यायालयाचा डॉक्‍टरांना 5000 रु. दंड 

लखनौ (उत्तर प्रदेश): खराब अक्षराबद्दल एका डॉक्‍टरांना 5,000/- रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाने बहराईचमधील एक डॉक्‍टर रमाशंकर गुप्ता यांना एका याचिकेच्या संदर्भात हा दंड ठोठावला आहे. डॉक्‍टर रमाशंकर गुप्ता यांनी सासरी हत्या झालेल्या एका महिलेच्या मृत्यूचा लिहिलेला पोस्टमॉर्टेम रिपोर्ट वाचताना अत्यंत खराब अक्षरामुळे आलेल्या अडचणींमुळे त्यांना दंड करण्यात आला आहे.

श्री शिवपूजन नावाच्या व्यक्तीच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर नुसार त्यांचा विवाह 6 वर्षांपूर्वी झाला होता. हुंड्यासाठी त्यांच्या पत्नीचा छळ केला जात असे. त्यांच्या पत्नीचा मृत्यूप्रकरणी त्यांच्यावर खटला दाखल केलेला आहे. गळा दाबल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याचा अहवाल आहे. मात्र खराब अक्षरामुळे हा अहवाल वाचताना अडचणी आल्या. कामाच्या ताणामुळे अक्षर खराब येते आणि “इमरजन्सी’ कामाच्या-खास करून पोस्ट मॉर्टेम अहवालाच्या वेळी असे खराब अक्षर होते असा जबाब डॉक्‍टरांनी दिला. न्यायालयाने तो मान्य केला नाही, आणि त्यांना रु. 5000 दंड ठोठावला.

-Ads-

पोस्टमॉर्टेम आणि जखमांचा अहवाल देताना वाचता येईल असा लिहावा अशी समज डॉक्‍टरांना सरकारने आणि न्यायालयाने अनेक वेळा देऊनही आणि दंड करूनही बदल झालेला नाही असे न्यायालयाने म्हटले आहे. आरोग्य सेवा महासंचालकांनीही या बाबत डॉक्‍टरांना गाईडलाईन्स दिलेल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)