खराबवाडी येथील अखंड हरीनाम सप्ताहाची सांगता

वाकी- विद्युत रोषणाईने सजविलेल्या आकर्षक मंडपात ज्ञानोबा-तुकोबाचा जयघोष करत, टाळमृदुंगाच्या गजरात खराबवाडी (ता. खेड) येथे सलग 8 दिवस सुरु असलेल्या अखंड हरीनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची ह.भ.प.अनिल महाराज वाळके यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता करण्यात आली. सप्ताह कालावधीत खराबवाडीसह या भागातील भाविक, तरुण कार्यकर्ते, महिला आणि ग्रामस्थांनी श्रवणसुखाबरोबर महाप्रसादाचा लाभ घेतला.
खराबवाडी ग्रामस्थांच्या वतीने येथे भैरवनाथ आणि बापूजीबुवा महाराजांच्या उत्सवानिमित्त सलग 8 दिवस अखंड हरीनाम सप्ताह आणि ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन केले होते. या सोहळ्यानिमित प्रारंभी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या अरुणा खराबी, शिवसेनेच्या तालुकाप्रमुख नंदाताई कड, माजी सरपंच योजना सोमवंशी, दिपाली खराबी आदींच्या हस्ते कलशपूजन करण्यात आले होते. ह.भ.प. विजय पवार, ह.भ.प.माणिक खराबी, माजी उपसरपंच प्रकाश खराबी, उद्योजक ज्ञानेश्वर सातव आदींच्या हस्ते ज्ञानेश्वरी पूजन, तर हनुमंत कड, मधुकर सातव, अमृता खराबी, नवनाथ कड आदींच्या हस्ते विणापूजन करण्यात आले. यावेळी अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुकाध्यक्ष ह.भ.प. विजय महाराज पवार, माजी सरपंच पांडुरंग बिरदवडे, सामाजिक कार्यकर्ते सोपानराव खराबी, शंकरराव पवार, यशवंत कड, शांताराम धाडगे, नंदाराम खराबी, मधुकर कड, बाळासाहेब खराबी, मधुकर टेकाळे आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्ताह कालावधीत सर्वश्री ह.भ.प. नारायण महाराज भडणे, ह.भ.प. अनिल महाराज पाटील, ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पिंगळे, ह.भ.प.चंद्रकांत महाराज वांजळे, ह.भ.प. नामदेव महाराज चव्हाण, ह.भ.प. नवनाथ महाराज म्हस्के, ह.भ.प. आसाराम महाराज बढे आदींची कीर्तनरुपी पार पडली. खराबवाडी येथील या हरीनाम सप्ताहामुळे अवघा परिसर भक्तीमय झाल्याने खराबवाडी गावाला यात्रेचे स्वरूप आले होते. समाजप्रबोधनकार ह.भ.प.अनिल महाराज वाळके यांच्या काल्याच्या कीर्तनाने या सोहळ्याची उत्साहात सांगता झाली. समस्थ ग्रामस्थ मंडळी खराबवाडी, उत्सव समिती, हनुमान प्रासादिक भजनी मंडळ आणि हनुमान प्रासादिक दिंडी सोहळा आदींनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)