खराबवाडीला कुस्त्यांचा जंगी आखाडा भरणार

वाकी – खेड तालुक्‍यातील खराबवाडी येथे शनिवार (दि. 24) ते रविवार (दि. 25 मार्च) या सलग दोन दिवसांच्या कालावधीत श्री. भैरवनाथ आणि बापूजीबुवा महाराजांचा उत्सव आयोजित केला आहे. या उत्सवानिमित्त श्रींची महापूजा, मांडवडहाळे, हारतुरे, करमणुकीचे विविध कार्यक्रम आणि निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात येणार आहे, अशी माहिती सरपंच सागर खराबी आणि माजी सरपंच हनुमंत कड यांनी दिली.

सालाबादप्रमाणे यंदाही खराबवाडी येथे वरील नियोजित दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी 6 वाजता श्रींची महापूजा, 10 नंतर मांडवडहाळे आणि हारतुरे हा कार्यक्रम, कै. गणपत अहिलू खराबी यांच्या स्मरणार्थ खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी खराबी, उद्योगपती सुभाष खराबी आणि जालिंदर खराबी यांच्या पुढाकारातून होणार आहे. सायंकाळी 7 वाजता पालखी आणि छबिना मिरवणूक भाजपनेते राजेंद्र खराबी, उद्योजक अमित सातव व राहुल कड यांच्या पुढाकारातून काढण्यात येणार आहे. करमणुकीसाठी रात्री 10 वाजता संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेले स्वर्गीय विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची सौंदर्य तारका संध्या माने सोलापूरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे.

रविवारी (दि. 25) दुपारी तीन ते सहा यावेळात पुणे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या प्रांगणात निकाली कुस्त्यांचा जंगी आखाडा आयोजित केला आहे. यावेळी विजेत्या पैलवानांना जाहीर करण्यात आल्याप्रमाणे रोख 55 हजार 555 रुपये विभागून देण्यात येणार आहेत. खराबवाडी ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि युवा उद्योजक जीवन खराबी, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खेड तालुका खजिनदार अरुण सोमवंशी, एस.एम.कोंटरेक्‍टर उद्योग समूहाचे संचालक व सदस्य मल्हारी केसवड, एच.ई.चे चेअमन हनुमंत खराबी आदींच्या वतीने विजेत्या पहिलवानांना विशेष बक्षीस जाहीर केले आहे. यावेळी माजी उपसरपंच प्रकाश खराबी, अखिल भारतीय वारकरी महामंडळाचे खेड तालुकाध्यक्ष विजय पवार, फायनल सम्राट श्रीपती खराबी, माजी उपसरपंच ज्ञानेश्वर सातव, उद्योजक ज्ञानेश्वर जंबुकर आदी उपस्थित राहणार आहेत. करमणुकीसाठी रात्री 10 नंतर रवी जाधव प्रस्तुत “धुमधडाका’ हा हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. समस्थ ग्रामस्थ मंडळी खराबवाडी, यात्रा कमिटी आणि हनुमान तरुण मंडळ आदींनी या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)