खराबवाडीत भटक्‍या कुत्र्यांचे हल्ले सुरूच

वाकी – चाकण-तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खराबवाडी (ता. खेड) परिसरात बालकांवर भटक्‍या कुत्र्यांचे हल्ले सुरुच आहेत. दोन दिवसांपूर्वी एका नऊ वर्षाच्या मुलावर या भटक्‍या कुत्र्यांनी प्राणघातक हल्ला केला आहे. एकाच महिन्यातील ही दुसरी घटना असल्याने या भागातील नागरिक भयभीत झाले आहेत. सबंधित बालक या हल्ल्‌यात गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर येथील एका खासगी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.
सोहम जोगदंड (वय 9, रा. खराबवाडी, ता. खेड) असे कुत्र्यांच्या हल्ल्यात जखमी झालेल्या बालकाचे नाव आहे. दिवसेंदिवस विस्तारणाऱ्या खराबवाडी सह चाकण शहरात भटक्‍या कुत्र्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून, रात्री – अपरात्री फिरणाऱ्या या मोकाट कुत्र्यांमुळे घराबाहेर पडणे ही अत्यंत जिकरीचे झाले आहे. रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना ही कुत्री केव्हा चावा घेतील, याचा थांगपत्ता लागत नसल्याने अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. गेल्याच महिन्यात चाकण येथील खंडोबा माळावर सात वर्षाच्या चिमुकल्या बालकावर भटक्‍या कुत्र्यांनी हल्ला चढवून त्यास गंभीर जखमी केले होते. एखाद्याला कुत्रे चावल्यानंतर त्याला चाकण येथील ग्रामीण रुग्णालयात त्यावर देण्यात येणारी लसही मिळेल की नाही, याचा भरवसा नाही. यामुळे कुत्र्यांच्या हल्ल्‌यात जखमी झालेल्यांना पुढील उपचारासाठी पिंपरी, चिंचवड अथवा पुणे येथे दवाखान्यात न्यावे लागते. त्यामुळे रुग्नासह त्याच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो.
चाकण भागातील राणूबाईमळा, खराबवाडी, झित्राईमळा, दावडमळा, माणिक चौक, आंबेठाण चौक, ब्राह्मण आळी, विशाल गार्डन, पानसरे मळा, मेदनकरवाडी, चक्रेश्वर मंदिर परिसर व चाकण नगरपरिषद हद्दीत गेल्या अनेक दिवसांपासून भटक्‍या व मोकाट कुत्र्यांनी मोठा धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सध्या जोर धरू लागली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)