खराबवाडीत कुस्त्यांच्या आखाड्यात तीनशे मल्ल भिडले

वाकी-खराबवाडी (ता. खेड) येथे सलग दोन दिवस सुरु असलेला श्री भैरवनाथ व बापूजीबुवा महाराजांचा उत्सव विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या उत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कुस्त्यांच्या जंगी आखाड्यात एकूण तीनशे नामांकित पैलवानांनी भाग घेऊन ही यात्रा गाजविली असल्याची माहिती सरपंच सागर खराबी व माजी सरपंच हनुमंत कड यांनी दिली.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी सकाळी श्रींची महापूजा, मांडवडहाळे व हारतुरे हा कार्यक्रम कै. गणपत अहिलू खराबी यांच्या स्मरणार्थ खेड पंचायत समितीचे माजी उपसभापती संभाजी खराबी, उद्योगपती सुभाष खराबी व जालिंदर खराबी यांच्या पुढाकारातून झाला. त्यानंतर सायंकाळी सात वाजता पालखी व छबिना मिरवणूक राजेंद्र खराबी, उद्योजक अमित सातव व राहुल कड यांच्या पुढाकारातून व ग्रामस्थांच्या सहकार्यातून काढण्यात आली. करमणुकीसाठी रात्री संपूर्ण महाराष्ट्रात गाजलेला स्व. विठाबाई भाऊ मांग नारायणगावकर यांची कन्या सौंदर्यतारका संध्या माने सोलापूरकर यांचा लोकनाट्याचा कार्यक्रम झाला. उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी चाकण – तळेगाव दाभाडे रस्त्यावरील खराबवाडी येथील महादेवी मंदिरासमोरील मोकळ्या जागेत कुस्त्यांचा जंगी आखाडा भरविण्यात आला होता. संभाजी खराबी, सागर खराबी, हनुमंत कड, जीवन खराबी, अरुण सोमवंशी, मल्हारी केसवड, प्रकाश खराबी, रघुनाथ खराबी, हनुमंत खराबी आदींच्या हस्ते नामांकित पहिलवानांच्या कुस्त्या लावण्यात आल्या. खेड, जुन्नर, आंबेगाव, शिरूर, मावळ, मुळशी, हवेली आदि तालुक्‍यातील नामवंत पहिलवानांनी उपस्थित राहून आखाड्यात हजेरी लावली. विजेत्या पहिलवानांना जाहीर करण्यात आल्याप्रमाणे रोख 61 हजार रुपये विभागून देण्यात आले. यावेळी उपसरपंच रोहिदास शिळवणे, माजी उपसरपंच प्रकाश खराबी, रवींद्र धाडगे, फायनल सम्राट श्रीपती खराबी, चाकण प्रशालेचे सेवानिवृत्त प्राचार्य मार्तंड खोडदे, रमेश गोरे, शंकर खराबी, गोरक्षनाथ कड आदींसह विविध क्षेत्रांतील प्रतिष्ठित मान्यवर, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. करमणुकीसाठी रात्री रवी जाधव प्रस्तूत धुमधडाका हा हिंदी मराठी गाण्यांचा बहारदार कार्यक्रम ठेवण्यात आला होता. समस्त ग्रामस्थ मंडळी खराबवाडी, यात्रा कमिटी व हनुमान तरुण मंडळ आदींनी या सर्व कार्यक्रमांचे आयोजन केले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)