खराबवाडीतील सर्वरोग निदान शिबीराला प्रतिसाद

वाकी-महाराष्ट्र युथ ऑर्गनायझेशन, ममता आणि चैतन्य ग्रुपच्या सहकार्याने खराबवाडी (ता. खेड) येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत सर्वरोग निदान शिबीराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिरात सहाशेहून अधिक गरजूंना मोफत गोळ्या व औषधांचे वाटप करण्यात आले.
पिंपरी – चिंचवडच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील सीएमओ डॉ. सचिन मुंढे, डॉ. रेणुका माळवी, डॉ. प्रवीण खरे, डॉ. नामांतर साबळे, डॉ. रेश्‍मा माधुरी आदींनी मोफत तपासणी करून गोळ्या औषधांचे वाटप केले. याप्रसंगी महाराष्ट्र यूथ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सुदर्शन देवकर, उपाध्यक्ष विश्वनाथ केसवड, अभिजित गजशिव, आनंद डोंगरे आदींसह या भागातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोग्य शिबिरे ही काळाची गरज असून, अशा शिबिरांमध्ये गरजूंचा मोठा सहभाग असायला पाहिजे, अशी अपेक्षा यावेळी डॉ. मुंढे यांनी व्यक्त केली. गरजूंसाठी मोफत आरोग्य शिबिरे आयोजित करण्याकरिता सेवाभावी संस्था, संघटना व कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला पाहिजे, असे त्यांनी यावेळी सुचविले. या शिबिरात हृदयरोग, मधुमेह, पोटांचे विकार, मणक्‍यांचे आजार, संधिवात, त्वचारोग, डोळ्यांचे आजार, लहान मुलांचे आजार आदी आजारांबाबत तपासणी करून मोफत औषधे देण्यात आली. महाराष्ट्र यूथ ऑर्गनायझेशनचे अध्यक्ष सुदर्शन देवकर, डॉ. रेणुका माळवी, डॉ. साबळे आदींनी या उपक्रमाचे कौतुक केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)