खराबवाडीतील विद्यार्थ्यांना सायकल वाटप

महाळुंगे इंगळे- खराबवाडी (ता. खेड) येथील खराबवाडी शिक्षण प्रसारक मंडळाच्या नव महाराष्ट्र विद्यालयातील होतकरू व गुणवंत विद्यार्थ्यांना चाकण रोटरी क्‍लबच्या पुढाकाराने सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. खराबवाडीचे माजी उपसरपंच व उद्योजक ज्ञानेश्‍वर सातव यांची चाकण रोटरी क्‍लबच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम स्वतःच्या खराबवाडी गावापासूनच नवनवीन उपक्रम राबविण्यास प्रारंभ केला आहे. खराबवाडी येथे दूरवरून शिक्षणासाठी येत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी या सायकलींचा उपयोग होणार आहे. येथे आयोजित करण्यात आलेल्या एका भरगच्च कार्यक्रमात खेडचे आमदार सुरेश गोरे, रोटरीचे माजी प्रांतपाल प्रमोद जेजुरीकर, पोलीस उपविभागीय अधिकारी राम पठारे, उपप्रांतपाल बाळासाहेब पोखरकर आदींच्या हस्ते या सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. यावेळी चाकण हार्ट फाउंडेशनचे उपाध्यक्ष ध्रुव कानपिळे, संदीप बागडे, चंद्रकांत हिवरकर, शामराव देशमुख, डॉ. प्रज्ञा भवारी भगवान घोडेकर, कीर्तीकुमार शहा, महेश कांडगे, एस. पी. देशमुख शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रोहिणी देशमुख, पांडुरंग बिरदवडे, हनुमंत कड, प्रकाश खराबी, उद्योजक शंकर खराबी, सुशीला सातव, दगडाबाई सातव, मुख्याध्यापक अविनाश कड आदींसह रोटरीचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक वृंद व शालेय विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)