खराबवाडीच्या सरपंच, उपसरपंचाचा राजीनामा

वाकी – खराबवाडी येथील ग्रामपंचायतीचे सरपंच सागर खराबी व उपसरपंच रोहिदास शिळवणे यांनी ठरलेल्या नियोजित कालावधीत स्वखुषीने राजीनामा दिला आहे. सरपंच पदावर इतरांना काम करण्याची संधी मिळावी, व गावचा विकास झपाट्याने व्हावा, यासाठी खराबी व शिळवणे यांनी पदाचे राजीनामे दिले असल्याची माहिती माजी सरपंच हनुमंत कड व माजी उपसरपंच रवींद्र धाडगे यांनी दिली.

खेड पंचायत समितीच्या सभापती सुभद्रा शिंदे यांच्याकडे खराबवाडीच्या कारभाऱ्यानी स्वखुशीने राजीनामा दिला आहे. यावेळी ग्रामपंचायतीचे सदस्य जीवन खराबी, मल्हारी केसवड, हनुमंत कड, रवींद्र धाडगे, उद्योजक भरत बिरदवडे आदि उपस्थित होते. खराबवाडी गावच्या सरपंच व उपसरपंच या दोन्ही पदांची येत्या सोमवारी (दि. 18) सकाळी अकरा वाजता येथील ग्रामपंचायतीच्या सभागृहात निवडणूक होणार आहे. त्यामुळे कोण होणार खराबवाडी गावचा बाजीगर?, कोणाला या पदावर काम करण्याची संधी मिळणार, याकडे संपूर्ण खराबवाडी ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.


-Ads-

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)