वाकी- नागरिकांना पिण्यासाठी चांगले व शुद्ध पाणी मिळावे, यासाठी खराबवाडी ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या पुढाकारातून खराबवाडी येथे 4 कोटी 92 लाख रुपये खर्चाची राष्ट्रीय पेयजल योजना कार्यान्वित झाली असून नुकताच तीचा शुभारंभ ही करण्यात आला. त्यामुळे खराबवाडीकरांना आता शुद्ध पाणी मिळणार असल्याने त्यांनी समाधान व्यक्‍त केले आहे.
यावेळी सरपंच सागर खराबी, उपसरपंच रोहिदास शिळवणे, ग्रामविकास अधिकारी दादाभाऊ सैद, शिवसेनेचे खेड तालुका प्रमुख प्रकाश वाडेकर, शिवसेना महिला आघाडीच्या तालुका प्रमुख नंदा कड, माधुरी खराबी, राजेंद्र खेडकर,अध्यक्ष राजेंद्र पवार, हनुमंत कड, रवींद्र धाडगे, उद्योजक जीवन खराबी, मल्हारी केसवड, भरत बिरदवडे, मंगेश पर्हाड, संतोष शिळवणे, दीपक मांडेकर, काजल शेडगे, रुपाली खराबी आदींसह विविध क्षेत्रातील प्रतिष्ठीत मान्यवर, ग्रामस्थ, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खराबवाडी गावचा विस्तार पाहता हा भाग दिवसेंदिवस खूप मोठा होत चालला आहे. या भागात राहणाऱ्या नागरिकांना भविष्यकाळात कसल्याही प्रकारची पाणीटंचाई जाणवणार नाही, याची जाणीव ठेवून खराबवाडीकर ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांनी घेतलेला पुढाकार सर्वाना दिशा देणारा आहे. माधुरी खराबी व रुपाली खराबी यांनी स्वागत केले. संतोष शिळवणे यांनी प्रास्ताविक केले. रवींद्र धाडगे यांनी सूत्रसंचालन, तर हनुमंत कड यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)