खरबूज, डाळींब, अननस, लिंबे महागली

सरासरी 20 टक्‍के भाववाढ : सफरचंद, पपई मात्र स्थिर
– मांसाहारासोबत लिंबांचीही मागणी वाढली

पुणे – मागणीच्या तुलनेत आवक घटल्याने खरबूज, डाळींब तसेच अननसच्या भावात 10 ते 20 टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. तर, आवक-जावक कायम असल्याने सफरचंद, कलिंगड, पपईचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान, नववर्षाच्या स्वागतासाठी मांसाहाराला मोठ्या प्रमाणात पसंती मिळत असल्याने लिंबाला मागणी वाढली आहे. परिणामी, लिंबाच्या भावात गोणीमागे 30 ते 50 रुपयांची भाव वाढ झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

-Ads-

रविवारी मार्केट यार्डातील फळबाजारात अननस सहा ट्रक, मोसंबी 50 टन, संत्री दोन टन, डाळींब 30 ते 40 टन, पपई 20 ते 25 टेम्पो, लिंबाची तीन ते चार हजार गोणी, चिक्कू एक हजार डाग, पेरु 700 ते 800 क्रेटस्‌, कलिंगड 15 ते 20 टेम्पो, खरबुज पाच ते सहा टेम्पो, सफरचंद चार ते पाच हजार पेटी, बोरे साडे अडीच हजार गोणी, द्राक्षे 10 टन तर स्ट्रॉबेरी पाच टन इतकी आवक झाल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रति गोणी) : 150-200, अननस (डझन) : 70-280, मोसंबी : (3 डझन) : 90-400, (4 डझन ) : 30-240, संत्रा : ( 3 डझन) 200-300, (4 डझन) : 100-200, डाळिंब (प्रति किलोस) : भगवा : 20-80, गणेश 10-30, आरक्ता 15-40. कलिंगड : 05-10, खरबुज : 10-30, पपई : 05-15, चिक्कू : 100-500, पेरू (20 किलो) : 300-600, सफरचंद : सिमला 25 किलो) : 1200-1800, काश्‍मीर डेलीशियस (15 किलो) 700-1200, किन्नोर : ( 25 किलो) 2000-2500, अमेरिकन डेलीशियस : (15 किलो) 1000-1400, महाराजा ( 15 किलो) : 600-700. बोरे : चेकनट (10 किलो) 280-300, चण्यामण्या : 350-370, चमेली : 80-110, उमराण : 35-50, द्राक्षे : तासगणेश (15 किलो) 600-900, सुपर सोनाका (15 किलो) : 800-1500, जम्बो (10 किलो) : 600-1100, शरद (10 किलो) : 400-900, सोनाका (15 किलो) : 700-1100, सरिता (10 किलो) : 1000-1300, स्ट्रॉबेरी 140-250.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)