खरगे आणि गोयल यांच्यात लोकसभेत जोरदार खडाजंगी

नवी दिल्ली – सध्या अर्थ खात्याचा कारभार सांभाळत असलेले पीयुष गोयल आणि कॉंग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जून खरगे यांच्यात सभागृहात जोरदार खडाजंगी झालेली पहायला मिळाली. जीएसटी कायद्यात दुरूस्ती सुचवणारे एक विधेयक लोकसभेत सादर करताना पीयुष गोयल यांनी 45 मिनीटांचे भाषण केले. त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका करताना नमूद केले की सन 2019 मध्ये होंणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा दारूण पराभव होणार असून कॉंग्रेसची सदस्य संख्या 44 वरून केवळ 4 वर येईल असे ते म्हणाले.

त्यावर गोयल यांना उत्तर देताना खरगे म्हणाले की गोयल यांनी आजवर लोकांमधून एकही निवडणुक लढवलेली नाहीं ते राज्यसभेवर नियुक्त केले गेले असून त्याद्वारे ते केंद्रीय मंत्री झाले आहेत हे त्यांनी लक्षात घ्यावे. खरगे यांच्या या दाव्यावर त्यांना प्रत्युत्तर देताना गोयल म्हणाले की खरगे यांनी माझ्या विरूद्ध मुंबईतून लोकसभा निवडणुक लढवून दाखवावी.
सभागृहात जीएसटी सुधारणा विधेयकावर चर्चा सुरू असताना कॉंग्रेसने राफेल विमान खरेदीतील गैरव्यवहाराची चौकशी करावी ही मागणी लाऊन धरत सभागृहात गोंधळ सुरू केला होता. त्यावेळी दोन्ही सदस्यांमध्ये ही शाब्दिक चकमक झडली.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राफेल विमानात प्रचंड घोटाळा झाला असून त्याची संयुक्त संसदीय चौकशी समिती नेमून चौकशी करावी अशी मागणी कॉंग्रेस सदस्यांनी लोकसभेत केली. त्यासाठी त्यांनी सभापतींच्या आसनापुढे जाऊन घोषणाबाजी केली. तथापी सत्ताधारी सदस्यांनी त्यांना बोलू दिले नाहीं. राफेलवर चर्चा करणे भाजपला अडचणीचे ठरणार असल्याने त्यांना या विषयावर चौकशीच काय पण साधी चर्चाही नको आहे. त्यातून विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप कॉंग्रेसतर्फे करण्यात आला. कॉंग्रेस सदस्यांना राफेलचा विषय उपस्थित करू देण्यास अनुमती नाकारण्यात आल्यानंतर कॉंग्रेस सदस्यांनी सभात्याग केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)