खरंच तुम्ही लग्नासाठी तयार आहात का?

सध्या लग्नाचे वादळ वातावरण सगळीकडे पसरलेले दिसत आहे. आपले आवडते हिरो-हिरोइन्स लग्न करत आहेत. त्यात अनेक सेलेब्जचाही समावेश आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये लग्नाचे पेव पसरलेले दिसत आहे. दिवाळीनंतर तुलसी विवाह झाले की, लग्नाचा सिझन सुरू होतो; ते मे महिन्यापर्यंतसुद्धा चालू राहतो. लग्नासाठी आपण बरीच तयारी करतो महागडे कपडे, दागिने, लग्नाचे कार्यालय, पत्रिका इ. पण जिचे लग्न आहे तिला स्वतः लग्नासाठी सजण्या-सवरण्याचे खुप टेन्शन असते. कुणाला चेहऱ्यावर पिम्पलचे टेन्शन; तर कुणाला सावळा रंग गोरा करण्याचे टेन्शन! कुणाला बारीक असण्याचे तर कुणाला जाड असण्याचे.

या सर्व गडबडीमध्ये होणाऱ्या नवरीला आपण नेमकी काय काळजी घ्यावी हेच कळत नाही. भांबावून गेल्यासाखे होते. म्हणून खास विवाहेच्छुक असणाऱ्या मुलींसाठी आमच्या तर्फे विशेष काही टिप्स…

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

सखींनो लग्नासाठी त्वचा उजळ करण्यासाठी प्रथम खाण्या-पिण्यावर केंद्रित करा.
– सकाळी चहाऐवजी संत्र्याचा ज्युस घ्या.
– दिवसभरात फळे खाण्याकडे कल ठेवा.
– सकाळी उठल्यावर रात्री भिजवून ठेवलेले बदाम खा. त्वचेसाठी ते खुप उपयुक्त असतात. काळवंडलेली त्वचा डोळ्याखालील काळी वर्तुळे यामुळे कमी होतात.
– काकडी, टोमॅटो, कोबी, गाजर यांचे सलाड खाण्यावर भर द्या.
– ऑईली पदार्थ खाणे टाळा. तसे केल्यास पिंम्पल्सवर नियंत्रण ठेवता येईल.

हे झाले खाण्यापिण्याचे आता पार्लरकडे वळूया
– कमीत कमी तीन महिन्याआगोदर हेअर केअरचे पॅंकेज घ्या
– फेशियल स्क्रबिंग, स्कीन पॉलिशिंग आणि बॉडी पॉलिशिंग, मॅनिक्‍युअर आणि पेडिक्‍युअर हेड मसाज हेअर स्पा यांचे तुमच्या बजेट मध्ये बसेल तसे पॅकेज घ्या.

त्वचेसाठी घरगुती उपाय
– हळद, मलई, डाळीचे पीठ, मिक्‍स करून आंघोळीपूर्वी त्याचा पॅक चेहऱ्यावर लावावा.
– आठवड्यातून दोन वेळा पील ऑफ पॅक किंवा सॅंडल पॅक लावावा.
– डोळ्यांसाठी कापूस घेऊन बर्फाच्या पाण्यात भिजवावा व त्यात गुलाब पाणीसुद्धा मिक्‍स करावे व 10 मिनिटं आराम करावे त्याने डोळ्यावरील ताण कमी होऊन डोळ्यावरील वर्तुळे कमी होतात.

आनंदी राहा खुश राहा…

– रेणुका पवार/ भूमिका शहा


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)