खबरदार…वनहद्दीत धुडगूस घालाल तर!

नववर्ष पार्ट्यांवर करडी नजर : अतिउत्साही मंडळी अडकणार

पुणे – नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जंगल परिसर अथवा एकाकी टेकड्यांवर पार्टीचे “प्लॅनिंग’ करत असाल, तर आताच सावध व्हा. वनहद्दीत होणाऱ्या पार्ट्यांवर यंदा वनविभागाची करडी नजर राहणार असून, यावेळी दोषी आढळलेल्या अतिउत्साही नागरिकांवर कायदेशीर कारवाई करण्याची तयारी विभागाकडून केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला हॉटेल, रेस्तरॉंमध्ये होणारी गर्दी, गजबज आणि “वेटिंग’ टाळण्यासाठी अनेक उत्साही पुणेकर “आउटिंग’ला प्राधान्य देतात. यात विशेषत: शहराबाहेरील जंगल परिसर अथवा टेकड्यांवरील जंगलात नवीन वर्षाचे सेलिब्रेशन करण्यासाठी मोठी पसंती दिली जाते. यामध्ये मुळशी, पौड, ताम्हिणी, लोणावळा तसेच सिंहगड, तळजाई, हनुमान, एआरएआय टेकडी अशा विविध ठिकाणांवर पार्ट्यांचे प्लॅनिंग केले जाते.

मात्र, या सेलिब्रेशच्यावेळी तळीरामांच्या गैरप्रकाराचे प्रमाणही वाढते आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वाहतुकीची कोंडी, वनसंपत्तीचे नुकसान, वन्यप्राण्यांची शिकार यांसारखे गैरप्रकार केले जातात. यामध्ये वनसंपत्तीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. हे टाळण्यासाठी वनविभागाने गस्तीवरील सुरक्षारक्षकांची संख्या वाढवून या परिसरांवर कठोर नजर ठेवण्यासाठी तयारी सुरू केली आहे. याअंतर्गत वनहद्दीत दि. 31 डिसेंबरच्या रात्री गस्त वाढविण्यात येणार आहे. तसेच पोलिसांसोबत याबाबत चर्चा करून ही गस्त अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

न्यू इयर सेलिब्रेशनसाठी वनहद्दीत धुडगूस घालणाऱ्या आणि त्यात दोषी आढळणाऱ्या नागरिकांवर वनकायदा तसेच भारतीय दंडविधान या दोन्ही कायद्यांतर्गत कारवाईदेखील करण्यात येणार आहे.
– महेश भावसार, सहायक उपवनसंरक्षक, पुणे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)