खबरदार, रूळांलगत ‘उघड्यावर’ बसाल तर!

कारवाईसाठी रेल्वे प्रशासनाची पथके तैनात

पुणे – रेल्वे रूळांलगत वर शौचास बसणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. संगम ब्रीज ते शिवाजीनगर, पिंपरी, चिंचवड, खडकी, दापोडी परिसरात ही संख्या लक्षणीय असून अशा लोकांवर यापुढे कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी खास पथक तैनात करण्यात आल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड आणि परिसरातील रेल्वे रुळावर स्थानिक परिसरातील लोक मोठ्या संख्येने “उघड्यावर’ बसतात. परिणामी परिसरात दुर्गंधी तसेच पर्यावरणाची हानी होत आहे. त्याचबरोबर काम करणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्यांनाही दुर्गंधीचा त्रास होत असून ही गोष्ट चिंताजनक आहे. रेल्वे रुळांच्या परिसरात स्वच्छतागृहांची संख्या वाढविण्याची मागणी रेल्वे प्रशासनाने स्थानिक प्रशासनाकडे वारंवार केली. मात्र, याकडे स्थानिक प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने सुविधा उपलब्ध होत नाही. त्यामुळे अपरिहार्यता किंवा अन्य कारणांस्तव परिसरातील लोक मोठ्या संख्येने रेल्वे रूळांलगत शौचास बसतात. या पार्श्‍वभूमीवर ही कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली असून अशाप्रकारे कोणी आढळून आल्यास त्याला 500 रुपयांचा दंड लावण्यात येईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)