खबरदार! बॅनर्स, पोस्टर्स लावाल तर…

– 750 रुपये चौरस मीटरप्रमाणे दंड

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मिळकती अथवा सार्वजनिक ठिकाणी बेकायदेशीरपणे पोस्टर्स, बॅनर्स अथवा भित्तीपत्रके लावल्यास शहर विद्रुपीकरण केल्याप्रकरणी संबंधितांकडून 750 रुपये प्रति चौरस मीटर दराने प्रशमन शुल्क आकारले जाणार आहे. याशिवाय आरोग्य निरिक्षकांकडून संबंधितावर गुन्हा देखील दाखल करण्यात येणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेच्या मान्यतेकरिता पाठविण्यात आला आहे.

-Ads-

स्थायी समिती सभागृहात बुधवारी (दि. 8) झालेल्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या. महापालिकेचे उड्डाणपूल, इतर मिळकती व सार्वजनिक ठिकाणे ही हक्काची जाहिरात ठिकाणे असल्याच्या अविर्भावात अनेक संस्थाकडून या ठिकाणी पोस्टर्स, भित्तीपत्रके व बॅनर्स लावले जातात. यामुळे या परिसराला ओंगळवाणे स्वरुप येते. या प्रकारांना आळा घालण्यासाठी या विषयावर स्थायी समिती सभेत दोन-तीन वेळा चर्चा देखील करण्यात आली.

त्यानंतर सहशहर अभियंता राजन पाटील यांच्याकडे या कारवाईची सुत्रे देण्याचे ठरविण्यात आले. मात्र, या निर्णयात बदल करत, ही जबाबदारी आरोग्य विभागाकडे सोपविण्यास स्थायीने मान्यता दिली आहे. बुधवारी पार पडलेल्या स्थायी समितीच्या साप्ताहिक सभेत दंडाची रक्कम ठरविण्यात आली आहे. मात्र, याकरिता महासभेची मान्यता घेण्यासाठी हा प्रस्ताव महासभेकडे पाठविण्यात येणार आहे.

116 कोटींच्या खर्चाला मान्यता
पंतप्रधान आवास योजने अंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील बोऱ्हाडेवाडी येथे आर्थिक दुर्बल घटकांसाठी 1 हजार288 निवासी सदनिका बांधण्यात येणार असून त्यासाठी येणाऱ्या सुमारे 112 कोटी 19 लाख रुपयांच्या खर्चासही शहरातील विविध विकास कामे करण्यासाठी येणाऱ्या सुमारे 115 कोटी 90 लाख रुपयांच्या खर्चास स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.प्रभाग क्रमांक 35 भोसरी सर्व्हे क्रमांक 1 मधील दवाखाना इमारतीसाठी बैठक व्यवस्था व स्थापत्य विषयक कामांसाठी 73 लाख 38 हजार रुपये, महापालिका मुख्यालय व इतर विविध कार्यालयांच्या नेटवर्किंगचे दुरुस्ती व देखभालीसाठी 1 कोटी 38 लाख 90 हजार रुपये, नागरी सुविधा केंद्र संगणक प्रणाली देखभाल दुरुस्तसाठी 22 लाख 41 हजार रुपये, पर्यावरण अभियांत्रिकी विभागाकडील प्रभाग अ, ब आणि फ पंपीग स्टेशनमधील स्थापत्य कामांसाठी सुमारे 45 लाख 17 हजार रुपये तसेच उद्यान विभागाच्या जिजाऊ पर्यटन केंद्र भाग 1 व 2 पार्वती उद्यान देखभाल व संरक्षणासाठी 41 लाख 14 हजार रुपये खर्चाचा समावेश आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)