चिंबळी – यंदाचा खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे पेरणी पूर्व मशागतीला वेग आला आहे. बियाणे व रासायानिक खतांचा अपेक्षित साठा व पुरवठा करण्यासाठी शासकीय यंत्रणा गतीमान बनली आहे. हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पाऊस वेळेवर सुरु होईल हे गृहित धरून खेडच्या दक्षिण भगात शेतात खते पांगवण्याच्या कामात शेतकरी मग्न आहे. चिंबळी, कुरुळी, निघोजे परिसरात सध्या टॅक्‍टरच्या साह्याने शेतीची मशागत करुन शेणखत टाकून ते पांगवण्याच्या कामात शेतकरी मग्न आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)