सातारा सातारा शहरातील खणआळीतून एका महिलेची पर्स चोरीला गेल्याची घटना समोर आली. याप्रकरणी शाहूपुरी पोलिस ठाण्यात अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा नोंद झाला आहे.शितल गणेश शिंदे रा. पाटखळमाथा,ता. सातारा या शनिवारी दुपारी गौरी सजावटीचे साहित्य खरेदीसाठी खणआळीत गेल्या होत्या.

त्यांनी सजावटीचे साहित्य खरेदी करताना त्यांच्याकडे असलेली पर्स दुचाकीला अडकवली होती. त्यानंतर साहित्य खरेदी करण्यासाठी एका गाड्यावर गेल्या. खरेदी झाल्यानंतर पैसे देण्यासाठी त्यांनी दुचाकीला अडकवलेल्या पर्स पाहिली. मात्र पर्स नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यावेळी त्यांनी आजुबाजूला पाहिले मात्र पर्स मिळाली नाही. पर्समध्ये गंठण,अंगठी,एक हजार रोख,मोबाईल असा 89 हजाराचा मुद्देमाल असल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)