खड्डे बुजविण्यासाठी बाप्पांच्या आगमनाचाच महूर्त

राज्य सरकारला 5 सप्टेबरचा अल्टीमेटम
मुंबई – मुंबई ते गोवा राष्ट्रीय महामार्गवरील सर्वच्या सर्व खड्डे 5 सप्टेंबर पूर्वी बुजवून हा महामार्ग खड्डे मुक्‍त करा, असा आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला दिले. तसेच काम पूर्ण केल्याचा प्रगत अहवाल 10 सप्टेंबर पर्यंत सादर करा असेही न्यायालयाने बजावले.

राज्य सरकार आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने प्रतिज्ञापत्र सादर करून रस्त्याची जबाबदारी निश्‍चित करून एकूण 503 किमी लांबीच्या या महामार्गावरील पनवेलपासूनचा पहिल्या 84 किमीचा टप्पा हा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अखत्यारीत येतो त्यात सुमारे 9 कि. मी.मध्ये खड्डे आहेत तर नंतरचा 386 किमी चा पल्ला हा राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत येत असून त्यात सुमारे 45 कि.मी.मध्ये खड्डे आहेत.

-Ads-

हे सर्व खड्डे 5 सप्टेंबर पर्यंत बुजविले जातील, अशी हमी दिली. याची दखल न्यायालयाने घेतली. हा महामार्ग 5 सप्टेबर पर्यंत खड्डे मुक्‍त करा आणि केलेल्या कामाचा अहवाल 10 सप्टेंबर पर्यंत सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)