खड्डे अन्‌ खचलेल्या साईडपट्ट्यांमुळे अपघातांमध्ये वाढ

वाई ः रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेले मोठे खड्डे.

वाईच्या पश्‍चिम भागात अपघातांची मालिका, रस्त्यांचा प्रश्न ऐरणीवर

वाई, दि. 22 (प्रतिनिधी) – वाई तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर पडलेले मोठमोठे खड्डे आणि खचलेल्या साईडपट्ट्या याशिवाय रस्त्याकडेला वाढलेले गवत यामुळे या मार्गांवरील अपघातांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली आहे. दरम्यान, संबंधित प्रशासनाने याची वेळीच दखर घेऊन रस्त्यांची दुरुस्ती करावी तसेच तात्काळ रस्त्याकडेला वाढलेले गवत काढण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांमधून जोर धरत आहे.
वाईचा पश्‍चिम भाग अतिशय दुर्गम व डोंगराळ भाग म्हणून परिचित आहे. नुकत्याच वाई-आकोशी एसटीबसला बोरगांवजवळ झालेल्या अपघाताच्या घटनेने या भागातील अनेक प्रलंबित प्रश्न समोर आले आहेत. हा अपघात केवळ चालकांच्या अती घाई व बेपर्वाईमुळे झाला अशी प्रवाशांची प्रतिक्रिया असली तरी अरुंद रस्ता आणि खचलेल्या साईडपट्ट्या तसेच रस्त्याकडेला वाढलेले गवत हेदेखील या अपघातास तितकेच कारणीभूत आहे.
वाईहून पश्‍चिम भागात संपूर्ण रिंग रोड हा जवळपास 70 किलोमीटरचा आहे. सध्या या रिंगरोडची अवस्था अतिशय दयनीय झालेली आहे. याची डागडुजी करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाची असून या विभागाकडून रस्त्याच्या दुरवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष झाल्याने स्थानिक ग्रामस्थ व प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. सध्या या रस्त्यावर वाहनाचा अंदाज न आल्याने अनेक दुचाकी व मोठ्या वाहनांचे वारंवार अपघात घडून अनेकाना कायमचे जायबंदी व आपल्या प्राणास मुकावे लागले आहे.

-Ads-

सध्या पश्‍चिम भागातील रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत, तसेच साईडपट्ट्याही खचल्या आहेत. त्यामुळे अपघातांच्या घटना टाळण्यासाठी बांधकाम विभागाने तात्काळ रस्त्याच्या दुरुस्तीसाठी पुढाकार घ्यावा, अन्यथा जनता रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
प्रकाश वाडकर, प्रा. बोरगांव हायस्कूल

पश्‍चिम भागातील रस्ते अरुंद असून पावसाळ्यानंतर त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडल्याने वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागते, तर रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी साईड पट्ट्या खचून वाढलेले गवत व झुडपे यामुळे समोरून येणारे वाहनाचा अंदाज येत नाही. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे तातडीने उपाय योजना करावी.
रामचंद्र वीरकर, ग्रामस्थ- मालदपूर

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)