खड्डयांत केली भात लागवड

राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या वतीने कोल्हेवाडी फाटा येथे रस्त्यामध्ये भाताच्या रोपांची लागवड करून निषेध व्यक्त करण्यात आला.

रस्त्यावरील खड्डयांच्या निषेधार्थ राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनोखे आंदोलन

पुणे :  राष्ट्रवादी महिला कॉग्रेसच्या वतीने कोल्हेवाडी फाटा येथे रस्त्यामध्ये भाताच्या रोपांची लागवड करून निषेध व्यक्त करण्यात आला. या रस्त्यावर गेल्या अनेक दिवसांपासून मोठ्या प्रमाणात खड्‌डे झाले असून वारंवार अपघातही घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाचे डोळे उघडण्यासाठी हे अनोखे आंदोलन करण्यात आले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखालील हे आंदोलन करण्यात आले, काका चव्हाण,पुनम मते ,सुरेखा दमिष्टे,शुभांगी खिरीड ,दिपक मते ,सौरभ मते ,सुधाकर गायकवाड व कार्यकर्ते व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेक महिन्यापासुन रस्तात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी अवस्था असलेल्या या नांदेड फाटा ते सिंहगड पायथा रोडमुळे नेहमीच वाहतुक कोंडी होते.
अनेक अपघात होतात.याची दखल घेतली जावी व तातडीने रस्ते दुरूस्त केले जावेत यासाठी हे वेगळ्या पद्धतीने आंदोलन करून सरकारचे लक्ष वेधून घेतले जाणार असल्याचे यावेळी चाकणकर यांनी बोलताना सांगितले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
23 :thumbsup: Thumbs up
3 :heart: Love
1 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
1 :blush: Great
0 :cry: Sad
1 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)