खडी रस्त्यावर आल्याने अपघाताचा धोका

सातारा, दि. 10 (प्रतिनिधी) – राधिका रोडवर शिवसह्याद्री स्कूलसमोर रस्त्यावर खडी उचकटून वर आल्याने अपघाताची शक्‍यता आहे. राधिका रस्त्यावर शिवसह्याद्री स्कूलपासून फेडरल बॅंकेपर्यंतच्या रस्त्यावर मोठमोठाले खड्डे पडले होते. त्यामुळे पावसाळ्यात याठिकाणी तळे साचले होते. पावसाने उघडीप दिल्यानंतर या रस्त्यावर सध्या बारीक खडी पसरल्याचे दिसत असून याठिकाणी वाहन चालकांना सावधपणे जावे लागत आहे. ग्रेड सेप्रेटरचे काम सुरू झाल्यापासून या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ वाढली आहे. अनेक दुचाकी वेगात याठिकाणी जात असतात. या खडीवरून घसरल्याने काही वाहनांचे किरकोळ अपघात झाले आहेत. यामुळे संबंधित विभागाने तातडीने याठिकाणी रस्त्याची चांगली डागडुजी करण्याची गरज आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)