खडी मशीन चौकात ट्रेलरने ठोकरले चार वाहनांना

पुणे,दि.7- खडी मशीन चौकात मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास एक थरकाप उडवणारा अपघात झाला. यामध्ये भरधाव ट्रेलरने चार चारचाकी वाहनांना ठोकरले. अपघातात होंडासिटी कारच्या टपावर डस्टर कार चढली होती. मात्र अपघात भयंकर असूनही कारमधील एकाही व्यक्तीला दुखापत झाली नसल्याची माहिती कोंढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड यांनी दिली.

हा अपघात कात्रज -कोंढवा रस्त्यावर स्मशानभूमीच्या पुढे सकाळी अकराच्या सुमारास घडला. यासंदर्भात माहिती देताना सहायक पोलीस निरीक्षक चेतन मोरे यांनी सांगितले, दुपारी अकराच्या सुमारास एक भरधाव ट्रेलर कोंढव्याकडून कात्रजकडे चालला होता. त्याने प्रथम एका कारला जोरदार धडक दिली, यानंरत त्याचे ट्रेलरवरील नियंत्रण सुटल्याने पुढील तीन कारला त्याने एकापाठोपाठ ठोकर मारली. यामध्ये डस्टर कार चालकाला मागून ठोकर दिल्याने त्याने गाडी पुढे जाऊ नये म्हणून जोरात ब्रेक दाबला होता. त्याने ब्रेक दाबताच त्याच्या गाडीच्या पुढे आलेली होंडा सिटी कार डस्टरच्या कारच्या खाली घुसली. घटना घडताच आजूबाजूच्या नागरिकांना तातडीने कारमधील चालकांना बाहेर काढले. तसेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस घटनास्थळी दाखल होऊन मदतकार्य सुरु केले. दरम्यान अपघातामुळे कात्रज-कोंढवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. ही वाहतूक कोंडी नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना तासभर प्रयत्न करावे लागले.
* चौकट *
वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलींद गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनूसार अपघात भयंकर असला तरी सुदैवाने यामध्ये कोणालाच दुखापत झाली नाही. चार वाहनांचे मात्र नुकसान झाले आहे. यासंदर्भात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. ट्रेलर चालक मात्र घटनास्थळावरुन फरार झाला आहे.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)