संग्रहित फोटो

मंचर- काळभैरवनाथ लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालय, खडकी(पिंपळगाव) येथील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेविषयी आणि तंबाखूविरोधी शपथ घेतली. या कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी इयत्ता दहावीतील विद्यार्थ्याचा रोख रक्कम देऊन सन्मान करण्यात आला. विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील संस्थापक असलेल्या काळभैरवनाथ सौ. लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालयात विद्यार्थ्याचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाळासाहेब बांगर होते. सरपंच स्वाती वाघमारे, ह.भ.प. आदिनाथ महाराज जुन्नरकर, उद्योजक गोविंद खिलारी, खरेदी विक्री संघाचे संचालक पांडुरंग पाटील, दत्ता भोर आदी मान्यवर उपस्थित होते.
उद्योजक गोविंद खिलारी यांच्या वतीने इयत्ता 10 वीमधील मार्च 2018 च्या परीक्षेतील प्रथम तीन क्रमांकांच्या विद्यार्थ्याना सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले. तसेच महादु विनायक कुरकुटे यांच्या वतीने दरवर्षी 5 हजार रूपयांचे बक्षिस इयत्ता 10 वीतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्याना विभागून देण्यात येते. तसेच भाऊसाहेब बुळे यांच्याकडूनही 5 हजार रूपयांचे बक्षिस इयत्ता 10 वीतील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना देण्यात आले. काळभैरवनाथ सेमी इंग्लिश स्कूल, जिल्हा परिषद प्रथमिक शाळा खडकी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दिगद वसाहत, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांढरी वस्ती आणि काभैरवनाथ सौ लक्ष्मीबाई बाबूराव बांगर विद्यालय खडकी या शाळेमधील प्रत्येक वर्गातील प्रथम तीन क्रमांकाच्या विद्यार्थ्यांना ग्रामस्थांकडून रोख स्वरुपात बक्षिस देण्यात आले. प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील वळसे-पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कैलास पोखरकर यांनी केले. तर, चव्हाण यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)