खडकीत खातेदारांची कूचंबणा

हरीश शर्मा

खडकी – दुरुस्तीसाठी एटीएम बंद आहे, पैसे शिल्लक नाही, तांत्रिक अडचण असल्याने एटीएम बंद आहे अशा अनेक प्रकारचे बोर्ड खडकीतील बहुसंख्य एटीएम बाहेर लटकलेले दिसत आहे. तर काही एटीएमला टाळे लागले असून काहींचे शटर अर्धे खाली आहे. खडकीतील जवळ जवळ पंच्यावणं टक्के एटीएम अनेक दिवसांपासून बंद असल्याचे चित्र आहे. यामुळे खातेदारांची मोठी कुचंबणा होत आहे.
खडकीत क्वचित एखादा एटीएम सुरु असतो. मात्र त्याच्यासमोर भली मोठी रांग लागलेली असते. यामुळे खडकीतील नागरिकांना बॅंकेत पैसे असूनही आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. मात्र परिस्तिथीत कोणतीही सुधारणा होण्याची चिन्हे दिसत नाही.
खडकीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर हुले रस्ता, गंगा हाईट, शाहिद मार्ग, ऍमनेशन फॅक्‍ट्री रोड आदी ठिकाणी असलेले एटोएम ही कायम बंद असतात. याबद्दल बॅंकांकडे माहिती घेण्यासाठी खातेदार गेले असता बॅंकेतील कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. यावर संबंधीत विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी खडकीकरांनी केली आहे.

कोट
मागील अनेक दिवसंपासून खडकीतील एटीएम बंद आहे. यामुळे अचानक पैशांची गरज असल्यास पैसे मिळत नाही. एकीकडे सरकार म्हणते कॅशलेस राहा. एटीएम, पेटीएम, ऑनलाईन पेमेंटचा वापर करा. दुसरीकडे एटीएमची ही अवस्था असून ऑनलाईनमध्ये होणारी फसवणुकीचे प्रकार वाढत आहे. यामुळे सर्वसामान्य माणूस भरडला जात आहे. सरकारने आधी नियोजन करून मगच निर्णय घावे.
– अमर सिरसवाल, सरकारी कर्मचारी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)