खडकीत आज रास्ता रोको आंदोलन

देऊळगावराजे – शेतकरी संघटना आणि सुकाणू समितीचे सदस्य यांच्या वतीने सोमवारी (दि.14) पुणे-सोलापूर महामार्गावरील खडकी (ता. दौंड) येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी, अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात येणार आहे, असे सुकाणू समितीचे सदस्य संदीप लगड यांनी सांगिलते. तसेच वीजबिल माफ करुन दुधाला योग्य दर द्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे. कर्जमाफीबाबत भाजप सरकारने टाळाटाळ करण्यासाठी पोकळ आश्‍वासने दिली आहेत. सरकारने डॉ. स्वामीनाथन आयोगाप्रमाणे बाजारभाव देऊ, असे आश्‍वासन दिले होते. याची पूर्तता करावी, अशीही मागणी करण्यात येणार आहे. तरी, तालुक्‍यातील शेतकऱ्यांनी आंदोलनात सहभागी व्हावी, असे आवाहन लगड यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)