खडकवासला फुल्ल ; पहाटे 1700 क्‍यूसेक पाणी मुठा नदीत सोडणार

File photo

पुणे : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांपैकी एक असलेले खडकवासला धरण रात्री दहाच्या सुमारास 96 टक्के भरले आहे. त्यातच, धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने गुरूवारी पहाटे पासून धरणातून मुठा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. दरम्यान, पाटबंधारे विभागाकडून रात्री 10 वाजता खडकवासला कालव्यात 500 क्‍यूसेक पाणी सोडण्यात येत असून पहाटे नदीत सुमारे 1700 क्‍यूसेक पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)