संग्रहित छायाचित्र

पुणे – खडकवासला धरणात पोहायला गेलेल्या एका तरुणाचा बुडून मृत्यू झाला. सायंकाळी उशिरा त्याचा मृतदेह अग्निशमन दलाच्या मदतीने बाहेर काढण्यात यश आले. मित्रांसमवेत तो खडकवासला धरण परिसरात फिरायला आला होता.

गणेश बोडके (28, रा. शिवणे) असे मृताचे नाव आहे. प्राथमिक माहितीनुसार खडकवासला धरणावर पर्यटनासाठी आलेल्या तरुणांपैकी एक तरुण एलिना फार्मजवळ एक तरुण बुडल्याची घटना सायंकाळी घडली. त्याच्या मित्रांनी तातडीने परिसरातील नागरिकांना तसेच अग्निशमन दलाला याची कल्पना दिली. यानंतर काही तास शोधकार्य केल्यावर त्याचा मृतदेह आढळला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)