खडकवासला धरणातून 2 हजार 568 क्‍युसेकने विसर्ग

पुणे : खडकवासला धरणातून शुक्रवारी दुपारपासून पुन्हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या धरणातून सुमारे 2 हजार 568 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या चारही धरणांपैकी खडकवासला आणि पानशेत ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहेत. पावसाचा जोर वाढला की या धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते. त्यामुळे विसर्ग सुरू करण्यात येतो. शुक्रवारी पानशेत धरणातून तब्बल 1 हजार 980 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

त्याचबरोबर वरसगाव धरण सुध्दा 80 टक्‍याहून अधिक भरले आहे. पावसाचा जोर आणखी वाढला तर वरसगाव सुद्धा भरणार आहे.त्यामुळे खडकवासला धरणातून जादा सोडण्यात येत आहे. या धरणाव्यतिरिक्त चासकमान धरणातून 275 क्‍युसेक तर ऊळमोडी धरणातून 164 क्‍युसेक पाणी सोडण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)