खडकवासला धरणसाखळीत 36.29 टक्के साठा

पुणे – शहराला पाणीपुरवठा खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये एकूण 10.58 टीएमसी इतका पाणीसाठा म्हणजे 36.29 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक आहे.

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व धरणे 100 टक्के भरली. शहराला खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या चार धरणातून पाणी उपलब्ध होते. खडकवासला प्रकल्पात 1.59 टीएमसी, पानशेत धरणामध्ये 6.46 टीएमसी, वरसगाव धरणामध्ये 2.53 टीएमसी असा एकूण 10.58 टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. तर टेमघर धरण दुरुस्तीचे काम मागील एक वर्षांपासून सुरू असल्याने हे धरण लवकर रिकामे करण्यात आले आहे. त्यामुळे सध्या टेमघर धरणात उपयुक्त पाणीसाठा शिल्लक नाही.

-Ads-

जलसंपदा विभागाकडून उपलब्ध पाण्याचे नियोजन 15 जुलै पर्यंत करण्यात येते. साधारणपणे 7 जूनपासून पाऊस सुरू होतो. त्यानंतर हळूहळू पाणलोट क्षेत्रात पाणी साठण्यास सुरुवात होते. 15 जुलैपर्यंत ओढ्या-नाल्यांद्वारे धरणांमध्ये समाधानकारक पाणी जमा होते. त्यामुळे दरवर्षी 15 जुलैपर्यंत उपलब्ध पाण्याचे नियोजन करण्यात येते. शेतीसाठी सोडावे लागणारे पाणी, शहरासाठी पिण्यासाठी लागणारे पाणी आणि उन्हाळ्यात होणारे बाष्पीभवन या सर्व बाबींचा विचार करून उपलब्ध पाण्याचे नियोजन जलसंपदा विभागाकडून करण्यात आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)