खडकवासला कालव्याचे पाणी इंदापूर तालुक्‍यात

शेटफळगढे – खडकवासला कालव्याला रब्बी हंगामातील आवर्तन सोडण्यात आले आहे. हे पाणी इंदापूर तालुक्‍यात पोहोचले आहे. या पाण्याचा उपयोग गहू, हरभरा तसेच ऊस या पिकांसाठी होणार असल्याने शेटफळगढे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. खडकवासला कालव्यातून शेतीसाठी आवर्तन सोडण्यात आले असून हे पाणी इंदापूर तालुक्‍यातील शेटफळगढे परिसरात रविवारी (दि.28) पोहोचले आहे. टेल टू हेड पद्धतीने या कालव्यावरील शेती सिंचित केली जाणार आहे. तसेच वितरिकांना ही पाणी सोडले जाणार आहे. या पाण्याचा फायदा ऑगस्ट महिन्यात लागवड करण्यात आलेल्या ऊस तसेच रब्बी हंगामातील गहू, हरभरा या पिकांसाठी होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)