खडकवासला कालवा फुटीप्रकरणी चौकशीसाठी समिती गठीत

मुंबई: पुण्यातील खडकवासला प्रकल्पाच्या नवीन मुठा उजवा कालवा फुटीप्रकरणाची प्राथमिक चौकशी करण्यासाठी अधीक्षक अभियंता (पुणे) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पाच सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती १५ डिसेंबरपर्यंत आपला अहवाल शासनास सादर करणार असल्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी विधानपरिषदेत सांगितले.

विधानपरिषद सदस्य अनंत गाडगीळ यांनी  पुणे येथील खडकवासला धरणाच्या मुठा उजवा कालव्याची भिंत फुटल्याबाबतचा प्रश्न उपस्थित केला होता. यास उत्तर देताना विजय शिवतारे बोलत होते. कालवा फुटीमुळे ७३० कुटुंबे बाधित झाली आहे. शासनाने विशेष बाब म्हणून बाधित झालेल्या आपद्ग्रस्तांना मदतीचे वाटप करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे यांना तीन कोटी रुपये रक्कम मंजूर केली आहे.

कालव्याच्या सुरक्षिततेसाठी फुटलेल्या ठिकाणाची दुरुस्ती करून उर्वरित १४धोक्याच्या ठिकाणांची दुरुस्ती (भरावाचे मजबुतीकरण) यांत्रिकी विभागाच्या मशिनरी मार्फत करण्यात आली असल्याचे शिवतारे यांनी सांगितले. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री किरण पावसकर, हेमंत टकले, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)