“खडकवासला’वरील पाणी योजना ठप्प

  • इंदापूर तालुक्‍यातील स्थिती : आवर्तन सोडण्याच्या मागणीने धरला जोर

कळस – इंदापूर तालुक्‍यातील खडकवासला कालव्यावरील अनेक पाणी योजना सध्या पाण्याअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. तालुक्‍यास जानेवारीत देण्यात आलेले कालव्याचे आवर्तन लगेच बंद केल्याने ही परिस्तिथी उद्‌भवल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यापुढील उन्हाळा लक्षात घेऊन तालुक्‍यासाठी खडकवासला कालव्याचे आवर्तन सोडण्यात यावे, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्या वैशाली पाटील यांनी केली आहे. त्या म्हणाल्या की, पालकमंत्री गिरीश बापट यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आपण तालुक्‍याला खडकवासला कालव्यातून रब्बीची दोन व उन्हाळी दोन आवर्तन देण्याची मागणी केली होती, त्यानुसार पालक मंत्री उन्हाळ्यात दोन आवर्तन देण्याचे मान्य केले. धरणात पाणीसाठा बऱ्यापैकी असल्याने सध्या तालुक्‍यात आवर्तन देणे गरजेचे आहे. कळस, रुई, न्हावी, वायसेवाडी, धायगुडवाडी या गावातील शेती सिंचन व पिण्याच्या पाणी योजना सध्या पाण्याअभावी अडचणीत आल्या आहेत. त्यामुळे या भागात सध्या पाण्याची टंचाई जाणवत असल्याने आवर्तन सोडण्यात यावे अशी मागणी नागरिकांसह शेतकऱ्यांनी केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नीरा डावा कालव्याचे आवर्तन सोडण्याचा निर्णय झाला. या अनुषंगाने खडकवासला कालव्याच्या आवर्तनकडे तालुक्‍यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)