खडकवासलातील विसर्ग वाढविला

पुणे,दि.18 – पुणे जिल्ह्यातील बहुतांशी धरणे भरल्याने त्यातून विसर्ग सुरु करण्यात आला आह.आज सर्वाधिक पाणी हे खडकवासला (13 हजार 448क्‍युसेक) आणि वीर धरणातून (13 हजार 911 क्‍युसेक) सोडण्यात येत आहे.

गेले तीन ते चार दिवसांपासून पुणे जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे.त्याचबरोबर घाट माथ्यावर पावसाचा जोर अधिक आहे त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांशी मोठ्या धरणातून पाणी सोडण्यात येत आहे.काल संध्याकाळी (शुक्रवारी) खडकवासला धरणातून सर्वाधिक म्हणजे 18 हजार क्‍युसेक पाणी सोडण्यात येत होते त्यानंतर सकाळी त्याचे प्रमाण कमी करुन ते 11 हजार करण्यात आले.संध्याकाळी धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्याने 13 हजार448क्‍युसेक पाणी सोडण्यात सुरवात झाली.त्याचबरोबर पानशेत धरणातून 1हजार954 तर वरसगाव धरणातून 6 हजार 079, टेमघर मधून 260 क्‍यूसेकने विसर्ग सुरु आहे.

याशिवाय पवना 2 हजार 208, मुळशी 5000, डिंभे 5 हजार379, भाटघर 5 हजार 064, चासकमान 3 हजार220, क्‍युसेक ने पाणी सोडण्यात येत आहे.हे सर्व पाणी उजनी धरणात जमा होत असून हे धरण 50.61 टक्के भरले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)