खडकवासलाच्या पुनर्जीवनाचे काम सुरू

पुणे – शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन माजी सैनिक गट आणि “ग्रीन थंब’ यांच्यावतीने गेल्या 7 वर्षांपासून धरणाचे पुनर्जीवनाचे काम हाती घेण्यात आले आहे. खडकवासला धरणातील गाळ काढुन तिथे वृक्षलागवड करण्यात येत आहे. गाळ काढल्याने धरण क्षेत्राचे पाणलोट क्षेत्र वाढते. आतापर्यंत दहा लाख ट्रक गाळ काढून त्याचा वृक्ष लागवडीसाठी वापर करण्यात आला आहे. तसेच, पुन्हा गाळ जलाशयात जाऊ नये यासाठी कॅट तयार केले आहे, असे कर्नल सुरेश पाटील यांनी सांगितले. यावेळी ग्रीन थंबचे शरद मांडे, कर्नल लक्ष्मण साठे, नितीन राऊत आदी उपस्थित होते. गाळ काढुन तो शेतात टाकल्याने फळे, भाज्यांच्या उत्पादनासाठी पोशक असतात. त्यामुळे शेतकऱ्यांना त्याचे मोफत वाटप करण्यात येते. तसेच, शहरात हरीत अच्छादन करण्यात येत आहे. वृक्ष लागवड करून पक्षी संवर्धन करण्यात येत आहे, असे पाटील यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)