खडकवासलाचे पाणी इंदापुरात पोहचले

एक महिना उशीर; आठवडाभर आवर्तन सुरू राहणार

कळस – खडकवासला धरणसाखळीतून शेतीला पाण्याचे उन्हाळ्यातील शेवटचे आवर्तन इंदापूरला पोहचले असुन यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांना तब्बल महिनाभरानंतर उशीरा पाणी मिळाले आहे. पुणे शहराचा राखीव तीन टिएमसी पाणीसाठा शिल्लक ठेवून उर्वरित पाणी शेतीसाठी देण्यात आले आहे.

खडकवासला, टेमघर, वरसगाव आणि पानशेत या धरण साखळीवर हवेली, दौंड आणि इंदापूरसह बारामती तालुक्‍यातील 66 हजार हेक्‍टर शेती क्षेत्र अवलंबून आहे. खडकवासलातून सुटलेली आवर्तने या तालुक्‍यातील गावांकरिता अतिशय महत्त्वाची असतात. हे पाणी गेल्याच महिन्यांत इंदापुरला मिळणे गरजेचे होते. परंतु, जलसंपदा विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळे शेतकऱ्याच्या हक्काचे पाणी मिळवण्याकरिताही विनवण्या कराव्या लागत आहेत. पुणे शहराकडून वापर क्षमतेच्या प्रमाणापेक्षा जास्त पाणी वापर केला जात आहे. 2021 पर्यंत पुणे महानगरपालीकेला 11.50 टिएमसी पाणीसाठा मंजुर आहे. मात्र, प्रत्यक्ष 16 ते, 17 टिएमसी पाणी वापर होतो आहे. चार तालुक्‍यांच्या शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी पुणेकरांना दिले जात आहे.
दरम्यानर, अकोले येथील सणसर उपकालव्याला पाणी सोडणार नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या कालवा निरीक्षक मारकड यांनी सांगितले. शेतीचे हे शेवटचे उन्हाळी हंगामातील आवर्तन असून त्यानंतर पूर्व मोसमी पाऊस पडला तरच पुढील आवर्तन सोडले जाणार आहे. आणखी आठवडाभर हे आवर्तन सुरू राहणार असून या दरम्यान कालवा वितरीकांनाही पाणी सोडण्यात येणार आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)