खडकवाडी येथे रानडुकरांचा सुळसुळाट

वनविभागाने बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी

पारगाव शिंगवे- खडकवाडी (ता. आंबेगाव) येथे रानडुकरांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला आहे. शेतातील पाण्याअभावी ही पिके वाचवण्याचा प्रयत्न करीत असताना दुसरीकडे मात्र रानडुकरांनी या पिकांची नासधूस चालवली आहे.
शेतात रानडुकरे कळपाने येऊन जमीन उकरून या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान करीत आहेत. रानडुकरांमुळे शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी पिकांची राखण करण्याची वेळ आली, असून शेतकरी शेतात विजेचा प्रकाश करून या पिकांना रानडुकरांपासून वाचवण्यासाठी केविलवाणी धडपड करित आहेत. ही रानडुकरे शेतातील कांदा, मका, बटाटा, तसेच जनावरांचा हिरवा चारा या पिकांची मोठ्या नासधूस करित असून वनविभागाने या रानडुक्करांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
खडकवाडी गाव हे दुष्काळ ग्रस्त गाव म्हणून ओळखले जाते. पाऊस कमी झाल्याने या परिसरातील विहिरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. या परिसरातील थोड्याच शेतकऱ्यांनी विहिरीतील कमी असलेल्या पाण्यावर शेतात कांदा, बटाटा व जनावरांनाचा हिरवा चारा घेतला असून पाण्याअभावी जळून जाऊ लागलेली ही पिके शेतकरी वाचवण्यासाठी धडपड
करीत आहेत.

  • शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई देण्यात यावी व वनविभागाने या रानडुकरांचा तातडीने बंदोबस्त करावा अशी मागणी गावचे सरपंच अनिल डोके, व तंटामुक्तीचे अध्यक्ष
    एकनाथ सुक्रे , किरण वाळुंज यांनी केली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)