खडकपात्र वारी कोयनामाईच्या तिरी

कराड – तांबवे, ता. कराड येथे खडकपात्र वारीच्या निमित्ताने कोयनामाईच्या तिरी भक्तीचा मळा फुलवित असंख्य वारकऱ्यांनी विठूरायाचा गजर केला. नदीकाठी वाळवंटात गावातून दिंडी घेवून जावून काल्याचे कीर्तन करणे, व काल्याचा महाप्रसाद भाविकांना देण्याची आगळीवेगळी परंपरा अनेक वर्षापासून आजही अखंडीतपणे सुरु आहे.

तांबवे गावात गेली दोन ते तीन पिढ्यांपासून खडकपात्र यात्रा भरत आहे. गावामध्ये कृष्णतबुवा, बापूनाना महाराज, कृष्णाबाई यांच्या नावाने मंदिरात आठ दिवस अखंड ज्ञानेश्‍वरी पारायण सोहळा असतो. या सोहळ्यात अनेक नामांकित लोकांची कीर्तन व प्रवचन सेवा असते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

काल्यादिवशी प्रत्येक जण आपआपल्या घरातून भाकरी, डाळ घेवून नदीकाठी जायचे, भजन, कीर्तन झाल्यानंतर सर्वानी भोजनाचा आस्वाद घ्यायचा. अशी ही सांप्रदायिक यात्रा मोठ्या उत्साही वातावरण पार पडली. कराडचे मठाधिपती बाजीरावमामा कराडकर यांचे काल्याचे कीर्तनाने या पारायण सोहळ्याची सांगता करण्यात आली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)