खटाव येथे ई.व्हि.एम. व व्ही.व्ही.पॅड मशीनचे प्रात्याक्षिक

खटाव : ईव्हीएम व व्हीव्ही. पॅट मशीनचे प्रत्याक्षिक दाखवताना तलाठी जय बर्गे.

खटाव, दि. 10 (वार्ताहर) – खटाव येथे ग्रामपंचायत हॉलमध्ये मतदार जनजागृतीसाठी ई.व्ही.एम. व व्ही. व्ही. पॅड मशीनचे प्रात्याशिक दाखवण्यात आले.
मतदाराला मतदान व्यवस्थित झाले की नाही याबाबत संभ्रम होता. परंतु, आता ईव्हीएम आणि व्ही. व्ही. पॅट मशीनमुळे हा संभ्रम दूर मदत आहे. मतदान करतेवेळी मशीन समोरील आपल्याला हवे असणाऱ्या उमेदवाराच्या चिन्हासमोरील बटन दाबल्यानंतर व्ही.व्ही.पॅड मशीनमधून एक पावती निघेल. त्या पावतीवर मतदाराने ज्या उमेदवार मतदान केले आहे. त्याचे विवरण मतदारास 7 सेकंद स्क्रिनवर दिसेलही. या प्रक्रिये नंतर पावती निघेल. ती पावती मशीन मधील लॉक बॉक्‍स मध्ये जमा होईल. मशीन काही कारणाने तांत्रिक समस्या निर्माण झाली तर या पावत्याद्वारे सुद्धा मतमोजणी होऊ शकते. या प्रक्रियेची लोकांना माहिती व्हावी, लोकांमध्ये जनजागृती व्हावी या उद्देशाने हे प्रात्याक्षिक दाखविण्यात आले, अशी माहिती तलाठी जय बर्गे यांनी दिली.प्रात्याक्षिकप्रसंगी मंडल अधिकारी अमृत नाळे, निनाद जाधव, प्रकाश मोहिते आदींची उपस्थिती होती. खटावचे प्रथम नागरिक सौ. रत्नप्रभा घाडगे, द्वितीय नागरिक बबनराव घाडगे, सदस्य, ग्रामस्थ संख्येने उपस्थित होते.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)