खटाव – माण तालुक्यामध्ये अधिकार्‍यांच्या भ्रष्टाचाराला आमदारांचे पाठबळ

डॉ. येळगावकर यांचा आरोप : माणचे प्रांत, उपविभागीय पोलिस अधिकारी भ्रष्ट

सातारा, दि. 11 (प्रतिनिधी)-

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

खटाव माण तालुक्यात महसुल व पोलिस यंत्रणांनी भ्रष्टाचाराची सीमा ओलांडली आहे. खटाव आणि माण तालुक्यात महसूल व पोलीस खात्यातील अधिकारी यांची मोठी अंधाधूंदी सुरु आहे. आम्हाला याची लाज वाटते. अशा शब्दात माजी आमदार डॉ.दिलीप येळगावकर यांनी महसुल व पोलिस यंत्रणेवर तोफ डागली. या लाचखोरांना माणचे लोकप्रतिनिधीच पाठीशी घालत असल्याचा आरोप त्यांनी आ. जयकुमार गोरे यांच्यावर केला आहे. ते विश्रामगृहावर पत्रकारांशी बोलत होते.

शुक्रवारी लाच घेताना दहिवडीचा पीएसआय पळाला. म्हणजे यावरून हप्तेखोरी किती बोकाळली आहे. याचा अंदाज येतो असे सांगत त्याला डीवायएसपी यशवंत काळे हेच जबाबदार असल्याचा आरोप येळगावकरांनी केला आहे. तसेच प्रांत अधिकारी दादा कांबळे यांच्यामुळेच वाळू उपसा मोठया प्रमाणावर बोकाळला आहे. या दोन्ही अधिकार्‍यांना स्थानिक आमदार जयकुमार गोरे यांचेच पाठबळ मिळत आहे.

आमदार जयकुमार गोरे यांचा नेमका धंदा काय ? दर सहा महिन्याला महागड्या गाड्या येतात तरी कशा? असा सवाल उपस्थित करत त्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे येळगावकर यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. डॉ. येळगावकर म्हणाले, खटाव आणि माण या दोन तालुक्यात महसूल व पोलीस यंत्रणा बोकाळली आहे. सगळीकडे अंधाधूंदी सुरु आहे. कायदा सुव्यवस्था राहिली नाही. भ्रष्टाचार सुरु आहे. लाच घेताना पोलीस अधिकारी सापडला. पळूनही गेला. त्यास उपविभागीय पोलीस अधिकारी काळे हेच जबाबदार आहेत.

ते भ्रष्ट अधिकारी आहेत. त्यांची बदली झाली होती. परंतु माण तालुक्यात आमदारांच्या दहशतीमुळे इतर कोण अधिकारी येत नाहीत. पाठीमागे एका अधिकार्‍याला दमदाटी करतानाची आमदारांच्या वडिलांची क्लिप व्हायरल झाली होती. पोलीसही त्यांना घाबरतात. तसेच उगलमोगले या तलाठ्यावर कारवाई करण्याबाबतचे आदेश काढूनही त्याच्यावर कारवाई होत नाही. त्यास प्रांत कांबळे कारणीभूत आहेत, असा आरोप डॉ येळगावकर यांनी केला.

दरम्यान, 2012 पासून पैसे भरुनही प्रलंबित असलेल्या वीज कनेक्शनला शासनाने मंजूरी दिली आहे. जिल्ह्यातील 14 हजार 382 कृषी पंप कनेक्शन जोडण्याकरता शासनाने 318 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पैसे भरलेत पण वीज जोडणी मिळाली नाही अशा शेतकर्‍यांसाठी लवकरच उच्च दाब वितरण प्रणाली सरकार राबवणार असल्याची नाहिती त्यांनी दिली. त्या योजनेची सुरुवात 15 ऑगस्टला करण्यात येणार आहे, अशीही माहिती त्यांनी दिली.

जिहे कटापुर बाबत संभ्रम
जिहे कटापुर योजना मार्गी लावण्यासाठी केंद्राच्या बळीराजा संजीवनी योजनेतून 800 कोटी मिळाल्याचे भाजपाच्या एका नेत्याने काही दिवसापुर्वी जाहीर केले होते. याबाबत बोलताना येळगावकर यांनी अद्याप तरी असा कोणाताच निधी मिळाला नसल्याचे सांगितले. त्यामुळे जिहे कटापुरच्या निधीचे नेमके काय ? याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

… ते तर रावणराजे
रामराजे यांच्यांशी तुमचे विचार पटतात का? या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले जिल्ह्याचे रामराजे यांनीच वाटोळे केले आहे. जिल्ह्याला आज पाण्यापासुन वंचित ठेवण्याचे पाप त्यांनी केले आहे. त्यामुळे मी त्यांना रामराजे नाही तर रावणराजे मानतो. असा टोला त्यांनी लगावला.

डॉ.येळगावकर काय म्हणाले…
आ. गोरेंचा कोणता व्यवसाय आहे? ज्यामुळे दर सहा महिन्याला गाड्या बदलतात
भ्रष्ट अधिकार्‍यांना गोरेंचेच पाठबळ
उपविभागीय पोलिस अधिकारी यशवंत काळे भ्रष्ट
प्रांत दादा कांबळेंचे वाळु व्यवसायीकांना पाठबळ
दहिवडी, म्हसवड पोलिस ठाण्यात नवीन कर्मचारी नेमावेत
चौकशीचे आदेश असतानाही तलाठी उगलमोगले याला प्रांताचे पाठब


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)