खटाव तालुक्‍यात वाळुची तस्करी सुरूच

रात्रीच्या वेळी सर्रास वाळूचा उपसा

पुसेगाव, दि. 4 (प्रतिनिधी) – खटाव तालुक्‍यात मोठ्या प्रमाणावर वाळू तस्करी सुरू आहे. वाळू तस्कर नागरिकांची पिळवणूक करून वाजवीपेक्षा अधिक दराने वाळू महाग देत असून नव्याने रुजू झालेल्या तहसिलदार जयश्री आव्हाड यांनी वाळू तस्करांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी होत आहे.
सध्या बांधकामासाठी वाळूची मागणी वाढली आहे. त्यासाठी लहान-मोठ्या नद्यांच्या ओढ्याच्या पात्रातून अमर्यादपणे तालुक्‍यात वाळूचा उपसा होत आहे. या व्यवसायात अत्याधुनिक यंत्रांनी शिरकाव केला आहे. जेसीबी, पोकलेन अशा यंत्रांच्या मदतीने नदीपात्रातून वाळू उपसली जात आहे. खटाव तालुक्‍यातील नदी, ओढे पात्रात मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊन पाणीसाठा खालावला जात आहे. तक्रारीची दखल घेऊन महसूल विभाग ठराविक ट्रॅक्‍टरला दंड करून निघून जातो. त्यामुळे वाळू तस्करांचे फावले आहे. वाळू तस्कर दिवसा आराम करतात, मात्र रात्री दहा ते पहाटे सहापर्यंत कामगार, जेसीबी पोकलेन यांच्या सहाय्याने सर्रास वाळू उपसा करत आहेत. स्थानिक हद्दीतील तलाठी मात्र याबाबत मौन पाळून आहेत. यामुळे वरिष्ठ पातळीवरूनच याबाबत कारवाई करण्याची मागणी होत आहे. नुकताच तहसिलदार पदाची सुत्रे जयश्री आव्हाड यांनी घेतली आहेत. त्या कार्यक्षम अधिकारी असल्यामुळे त्या वाळु तस्करांना पायबंद घालतील, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)