खटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करा अन्यथा काळी दिवाळी साजरी करणार

संदीप मांडवे यांच्यासह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
सातारा, दि. 2 (प्रतिनिधी) – खटाव तालुक्‍यात दुष्काळ जाहीर करण्यास सरकार जाणीवपूर्वक विलंब करीत असल्याच्या निषेधार्थ दि. 6 नोव्हेंबर रोजी वडूज तहसिल कार्यालयासमोर काळी दिवाळी साजरी करण्यात येणार असल्याची माहिती माजी पंचायत समिती सभापती संदीप मांडवे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनिल पवार, नाना पुजारी, प्रमोद देवकर आदी. उपस्थित होते.
शासनाने जाहीर केलेल्या यादीत खटाव तालुक्‍याचा समावेश न केल्यामुळे शेतकरी जनतेमध्ये संतापाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर आंदोलनाची भूमिका घेण्यात येणार होती मात्र महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेवून दुष्काळी यादीत खटाव तालुक्‍याचा समावेश करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, जाहीर केलेल्या दुसरी यादीत देखील खटावचा समावेश न झाल्यामुळे हुतात्म्यांच्या भूमीची चेष्टा केली गेली आहे. त्यामुळे सुस्त प्रशासनाला जाग आणण्यासाठी काळी दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे संदीप मांडवे यांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)