खटाव तालुक्‍यातील पत्रकारांचा सन्मान

खटाव : तालुक्‍यातील पत्रकारांचा सन्मान करताना मान्यवर. (छाया : किरण देशमुख)

खटाव, दि. 9 (वार्ताहर) – पत्रकार दिनाचे औचित्य साधून 8 रोजी अपंग संघटना व शिवसेना खटाव शहर यांच्यावतीने खटाव येथे तालुक्‍यातील सर्व पत्रकारांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी राष्ट्रीय अपंग विकास महासंघाचे जिल्हाध्यक्ष, संजय गांधी निराधार योजना सदस्य अमिन आगा, शिवसेना उपजिल्हा प्रमुख प्रताप जाधव, खटाव-कोरेगाव विधानसभा क्षेत्र प्रमुख भानुदास कोरडे, खटाव तालुका शिवसेना उपाध्यक्ष दिनेश देवकर, महिपती डंगारे, अजित पाटेकर आदींच्या हस्ते पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी धनंजय क्षीरसागर, नम्रता भोसले आदी पत्रकारांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास पत्रकार संजय देशमुख, नितीन राऊत, किरण देशमुख, अक्षय यादव, शरद कदम, ईश्वर जाधव, दत्ता कोळी, आदी पत्रकार उपस्थित होते. या वेळी पोपट कुदळे, गजू पवार, गुलाब पवार, चंद्रकांत डोंबे, अमर देवकर, रमेश बोर्गे आदींसह अपंग संघटनेचे सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते. सुहासिनी डेंगळे आभार यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)