खटाव तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश व्हावा

विविध संघटनेचे विविध मागण्यांसाठी अन्न त्याग व बेमुदत धरणे आंदोलन सुरू

वडूज, दि. 28 (प्रतिनिधी)- खटाव तालुक्‍याचा दुष्काळी यादीत समावेश करावा व इतर मागण्यांसाठी येथील तहसील कार्यालयासमोर शहाजीराजे मित्र मंडळ व विविध संघटनेचे पदाधिकारी अन्नत्याग व बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. संजय गांधी निराधार योजनेचे विजय शिंदे, नगरसेवक शहाजीराजे गोडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नाना पुजारी,सोशल फाउंडेशनचे अंकुश दबडे, धनाजी लवळे, सुहास (लाला) गोडसे, मधुकर मोहिते आंदोलन करत आहेत. साखळी उपोषणास प्रा. सदाशिव खाडे, नितीन गोडसे,बाबा फडतरे, फयाज मुलाणी, प्रकाश गोडसे, जयकुमार बागल आदींसह अनेकजण बसले आहेत.

खटाव तालुका दुष्काळ जाहीर झाला पाहिजे, जिहे कटापूर उपसा सिंचन योजनेचे काम गतीने पूर्ण करावे, उरमोडी केनॉलद्वारे तालुक्‍यातील येरळवाडीसह सर्व लहान मोठी धरणे, बंधारे पाण्याने भरून द्यावे, उंबर्डे ओढा, वडूज मळवी ओड्याद्वारे येरळानदी पात्रामध्ये पाणी सोडावे, आंदोलकर्त्यावर प्रशासनाने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत अश्‍या विविध मागण्या आंदोलनकर्त्याच्या आहेत. या आंदोलनात अभेद सामाजिक संस्था, मानवाधिकार संघटना, संदीप मांडवे मित्र परिवार, शहाजीराजे मित्र मंडळ आधी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी भाग घेतला आहे.
वडुजचे नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, पंचायत समिती सभापती संदीप मांडवे, काकासाहेब मोरे, उपनगराध्यक्ष विपुल गोडसे, नगरसेवक प्रदीप खुडे, अभय देशमुख, वचनसेठ शहा, जयकुमार बागल, न्यानेश्वर इंगवले आदीसह ग्रामस्थ व तालुक्‍यातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आंदोलन स्थळी भेटी देऊन पाठिंबा दिला.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)